पुणे : शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

पुणे : पर्वती जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे गुरूवारी (ता.२४) शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे पाणी पुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे पाणी पुरवठा बंद असणारा भाग- पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग)- सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेजरोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर,सर्व्हे क्रमांक४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.चतु:श्रृंगी-एस.एन.डी.टी-वारजे जलकेंद्र परीसर :-पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर,रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मासोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर,अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रस्ता परीसर, नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड, खडकी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply