पुणे : शरद पवार, किरीट सोमय्या गिरीश बापट यांच्या भेटीला; गिरीश बापट यांच्या प्रकृतीची दोघांकडून विचारपूस

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. हे दोघे नेते एकाचवेळी रूग्णालयात दाखल झाले.खासदार गिरीश बापट श्वसनाच्या त्रासामुळे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू, असे शरद पवार यांनी बापट यांना सांगितले.

खचून जावू नका, लवकर बरे व्हा, असे किरीट सोमय्या म्हणाले.काही दिवसांपूर्वी  शरद पवार यांनी बालगंधर्व येथील कार्यक्रमावेळी खासदार गिरीश बापट यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. सोमय्या, शरद पवार यांच्याबरोबर माधव भंडारी, प्रवीण गायकवाड आणि अंकुश काकडे उपस्थित होते. खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोघांच्या संबंधाची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात कायम होत असते.
‘शरद पवार रूग्णालयात येणार असल्याचे कळाल्याने त्यांच्यासाठी थांबलो. दोघांनीही त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. पवारांना पाहिल्यानंतर त्यांना नमस्कार केला. सर्वच राजकारण्यांनी पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शरद पवार यांचे वेगळे स्थान असून मी त्यांचा आदर करतो, असे सोमय्या यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply