पुणे : व्यावसायिकाकडून महिलेवर बलात्कार ; ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी

पुणे : महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी एका व्यावसायिकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संजय कुंदनलाल परमार (वय ५७, रा. एकबोटे काॅलनी, अंजली अपार्टमेंट, घोरपडे पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. परमार यांच्या विरोधात खडक पोलिसांनी खंडणी; तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिला आणि आरोपी परमार ओळखीचे आहेत. परमार यांनी महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *