पुणे : वसंत मोरे यांची ‘राजनिष्ठा’, राज ठाकरेंच्या कार्यक्रमात तासभर उभे राहण्याची वेळ

पुणे : कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाट्यगृहात मागे भिंतीजवळ उभे राहून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही ‘राजनिष्ठा’ प्रेक्षकांच्या नरजेतूनही सुटली नाही.

अभिनेते अशोक सराफ यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी अशोक पर्व, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात अशोक सराफ यांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्यामुळे नाट्यगृहात खचाखच भरले होते.

या कार्यक्रमाला काहीसे उशीराने आलेले मनसे नेते वसंत मोरे यांनी मागे उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेणे पसंत केले. पण, मोरे मागे उभे राहिले आहेत, हे छायाचित्रकारांच्या नजरेतून सुटले नाही. कॅमेरे मागे वळताच सर्वांच्या नजरा वसंत मोरे यांच्यावर स्थिरावल्या. मात्र बसण्यासाठी जागा नसतानाही तासभर उभे राहून वसंत मोरे यांनी कार्यक्रमाला पूर्णवेळ हजेरी लावली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *