पुणे : वनाज-शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगवान; मेट्रो मार्गिकेच्या व्हायाडक्टच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

पुणे : मेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या मार्गिकेवरील व्हायाडक्टचे (दोन खांबांना जोडणारा भाग) काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामातील अजून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असल्याने वनाज ते शिवाजीनर स्थानकापर्यंतच्या उन्नत मार्गिकेवर लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी काही टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. यातील एक टप्पा पिंपरी-चिंचवड स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, वनाज ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, रामवाडी स्थानक ते शिवाजीनगर स्थानक, तसेच भूमिगत मार्गिकेपैकी स्वारगेट स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, रेंज हिल स्थानक ते शिवाजीनगर असे कामाचे टप्पे करण्यात आले आहेत. ही सर्व कामे एकावेळी आणि नियोजनात पूर्ण होण्यासाठी मेट्रोने विविध कंत्राटदार नियुक्त केले आहेत.

वनाज ते शिवाजीनगर सत्र न्यायालयापर्यंत मेट्रोची पश्चिम पूर्वेकडील मार्गिका ७.७ किलोमीटर लांबीची आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयापर्यंत व्हायाडक्टचे काम पूर्ण झाल्याने नजीकच्या काळात शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत मेट्रो लवकरच धावण्याची शक्यता आहे. डेक्कन स्थानक, छत्रपती संभाजी महाराज स्थानक, पुणे महापालिका स्थानक आणि शिवाजीनगर सत्र न्यायालय स्थानकांचे काम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply