पुणे/लोणावळा : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या मार्गावर वाहतूक नियंत्रणाची अद्ययावत यंत्रणा उभारणे आणि मार्ग आठपदरी करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. राजकीय नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर मार्गाशी संबंधित सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरी यापूर्वीही या मार्गावर अपघात घडल्यानंतर वेळोवेळी योजना जाहीर झाल्या. मात्र, त्या कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. अतिवेग, मार्गिकांचे नियम धुडकाविणे, यंत्रणांचे दुर्लक्ष आणि पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने हा रस्ता असुरक्षित असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. उपग्रह आणि ड्रोन कॅमेर यांच्याशी संलग्न ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) योजना लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महामार्गावरील अवजड वाहतूक तसेच वाहतूक कोंडीमुळे पडणारा ताण पाहता द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मेटे यांच्या मृत्यूनंतर अपघातस्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
अतिवेग, मार्गिका सोडून वाहने चालविण्याच्या बेदरकार वृत्तीमुळे अपघात घडल्याचे निरीक्षणही अधिकाऱ्यांनी नोंदविले. २००१ मध्ये मुंबई-पुणे शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग सुरू झाला. द्रुतगती मार्गामुळे दोन शहरातील अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचला. मात्र, गेल्या २२ वर्षांत द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात शेकडो जणांचे बळी गेले आहेत. द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आखलेल्या उपायोजना कागदावरच आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कामे दिली जातात. या संस्थांकडून अहवालही देण्यात येतो. मात्र, या अहवालातील उपाययोजना कागदावर आहेत. द्रुतगती मार्गावर झालेले बहुतांश अपघात मानवी चुका तसेच अतिवेगामुळे झाले आहेत.
वाहनांचा वेग ८० ते १०० किलोमीटर प्रतितास असावा, असा नियम आहे. मात्र, वाहनचालक नियम धुडकावून १२० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवितात. भरधाव वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून स्पीडगनद्वारे कारवाई करण्यात येते. मार्गिका सोडून वाहने चालविल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. अवजड वाहनचालक सर्रास मार्गिका सोडून जातात. यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी मार्ग खचला आहे. घाट क्षेत्रात कामे सुरू असताना त्याची माहिती देणारे फलक यंत्रणा वाहनचालकांना दिसेल अशा पद्धतीने लावत नाहीत. कामापासून काही अंतरावर लोखंडी कठडे लावणे गरजेचे आहे. मात्र, घाटक्षेत्रात ज्या ठिकाणी काम सुरू आहे. तेथे कठडे लावले जातात. अशा वेळी वाहनचालक मार्गिका सोडून वाहन पुढे नेतात. त्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. महामार्ग पोलिसांच्या कारवाईत सातत्य नसल्याने वाहनचालक सर्रास नियम धुडकावतात. द्रुतगती मार्गावरील अपघातांमागे यंत्रणाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.
शहर
महाराष्ट्र
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
- Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया