पुणे: लष्कराच्या दक्षिण कमांड प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह

पुणे: लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी मंगळवारी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. ले. जनरल सिंह हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. १९८४ मध्ये ते ७/११ गोरखा रायफल्समधून लष्करी सेवेत दाखल झाले. सियाचिन पासून वाळवंटी प्रदेशापर्यंत सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कामगिरी बजावली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) १/११ गोरखा रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले आहे. काश्मीर खोऱ्यासह ईशान्य भारतातही त्यांनी लष्करी जबाबदाऱ्यांवर काम केले आहे.

बेळगाव येथे कमांडो विंगचे प्रशिक्षक तसेच नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या (सैन्य) एकात्मिक मुख्यालयात मिलिटरी ऑपरेशन्सचे अतिरिक्त महासंचालक आणि महासंचालक (ऑपरेशनल लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक मूव्हमेंट) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मंगळवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करून ले. जनरल सिंह यांनी नवीन पदाची जबाबदारी स्वीकारली. लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन त्यांच्या ४० वर्षांच्या दीर्घ लष्करी कारकिर्दीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर दक्षिण कमांड प्रमुख पदाची धुरा ले. जनरल सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply