पुणे : रिक्षा संघटनांचा संप; आंदोलनाला हिंसक वळण, बाईक टॅक्सीचालकाला मारहाण

पुण्यात रिक्षा संघटनांनी आज, सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. रिक्षा संघटनेच्या या संपाला हिंसक वळण लागलेलं पाहायाला मिळत आहे. पुण्यात संपात सहभागी न होणाऱ्यांच्या रिक्षा चालकांच्या रिक्षा फोडण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे बाईक टॅक्सीचालकाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

बघतोय रिक्षावाला संघटना आज, सोमवारी बाईक टॅक्सीच्या विरोधात परिवहन कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करत आहे. बाईक टॅक्सी बंद कराव्यात यासाठी वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याचं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. जवळपास ३००० रिक्षाचालक एकत्र आले आहेत. पुण्यातील १२ संघटनांचा या रिक्षा बंदला पाठींबा आहे.

रिक्षा चालकांच्या या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर बाईक टॅक्सीचालकाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ कार्यालयासमोर बाईक टॅक्सीचालकाला मारहाण करण्यात आली आहे. तर सिंहगड रोड रस्त्यावर रिक्षा बंद आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षा अडवून काचा फोडण्यात आल्या आहेत.

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीमुळे रिक्षावाल्याचा ९० % व्यवसाय बुडत असल्याचा दावा रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीच्य विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. आम्ही ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सी बंद झाल्याशिवाय संप व मागे घेणार नाही, असा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेने दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply