पुणे : रिक्षा चालकांचे अनोखे आंदोलन, आरटीओ कार्यालय समोर रिक्षा दिल्या सोडून, पोलिसांनाच मोकळा करावा लागला रस्ता

पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकी विरोधात सकाळपासून पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांचे ठिय्या आंदोलन हे ‘ बघतोय रिक्षावाला ‘ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. जोपर्यन्त रॅपिडो बाइक टॅक्सी वाहतुक सेवा बंद होत नाही तोपर्यंत आरटीओ कार्यालयासमोरील जवळपास हजार रिक्षा काढणार नसल्याच्या भूमिकेवर सर्व रिक्षाचालक ठाम होते. यामुळे संचेती हॉस्पिटल ते पुणे स्टेशनपर्यंतचा मार्ग ठप्प होत शहरातील नागरिकांना अभूतपूर्व वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.  या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयासमोरील चौकात पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी रिक्षा चालकांसोबत संवाद साधला.

शहरात वाहतूक कोंडी झाली नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे, रिक्षा चालकांच्या मागण्याबाबत प्रशासनमार्फत कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे रिक्षा काढून घ्याव्यात,अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा कर्णिक यांनी रिक्षा चालकांना दिला. तेव्हा आरटीओ कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करणारे रिक्षा चालक जागेवरच रिक्षा सोडून देत तिथून निघून गेले. रिक्षा चालकांनी उचललेल्या या अनोख्या पावलामुळे अखेर पोलिसांनीच अनेक रिक्षा बाजूला करत रस्ता मोकळा करत परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply