पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यासाठी एकूण १७४० हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यात सर्वाधिक १६०१ हेक्टर क्षेत्र खासगी आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी लष्कराची जागा कुठेही घ्यावी लागणार नाही. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ कि.मी. लांबीचा आणि ११० मी. रुंदीचा रस्ता केला जाणार आहे.
दोन विभागात प्रकल्प विभागला
हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांत विभागण्यात आला आहे. पूर्व भागात मावळ तालुक्यातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एकूण ५६४ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यात खासगी ५२०.३२ हे., गायरान जमीन ०.२२ आर, वन विभागाची २३.५२ हे., तर इतर विभागांची २०.४० हे. क्षेत्र संपादित केले जाणार आहे. हवेली उपविभागीय अधिकारी खासगी ४८५.८९ हे., गायरान ८.२७ हे., वन जमीन ६२.८० हे. आणि इतर विभागांची ६.८५ हे. क्षेत्र संपादित होणार आहेत. भोर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी १५९.२२ हे., वन जमीन २.३३ हे. संपादित होणार आहे. पुरंदर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत १४६.९० हे. क्षेत्र खासगी आणि वन विभागाची ३.५६ हे. संपादित होणार आहे. खेड (राजगुरुनगर) उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी २८८.९५ हे., गायरान जमीन ३.८ हे. आणि इतर विभागाची साडेआठ हे क्षेत्र संपादित होणार आहे.
प्रकल्पबाधितांना अधिक मोबदला
मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यांतून पूर्व आणि पश्चिम वर्तुळाकार रस्ता जात आहे. या प्रकल्पात ८३ गावे बाधित होणार आहेत. त्यातील ७७ गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील २५० कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी प्राप्तही झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यात चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) दर, गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहार, या भागातील अन्य प्रकल्पाला दिलेला दर यापैकी जो अधिक असेल तो दर दिला जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रकल्पाचा आढावा
८४ पैकी ७७ गावांतील मोजणी पूर्ण
खासगी जागा १६०१.२९ हे., शासकीय जागा ११.५७ हे.
वन विभागाची जागा १४७.५२ हे.
शासनाकडील उपलब्ध जागा ३५.७४ हे.
प्रकल्पांची लांबी १७३.७३ कि.मी. (पूर्व ६८.८ कि.मी., पश्चिम १०४.९ कि.मी.)
प्रकल्पाची किंमत ३९,३७८.७८ कोटी रुपये
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel