पुणे – रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय दर निश्‍चित

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सर्व्हे नंबरनिहाय  दर  निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यास मान्यता मिळाल्यानंतर लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ) - केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्‍यातून जाणार आहे. तर पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोल नाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी ६९५ हेक्‍टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्यासाठी दर निश्‍चित करण्याचे काम गतीने सुरू आहे.

महत्त्वाचे निर्णय

  • भूसंपादनाचे मूल्यांकन ठरविताना त्यामध्ये एकसूत्रता आणणार
  • मूल्यांकन करताना कायद्यातील तरतुदींचे पालन करणार
  • समृद्धी महामार्गाचे भूसंपादन करताना अवलंबलेल्या कार्यपद्धती विचार
  • प्राथमिक दर निश्‍चित
  • अंतिम दर हे सर्व्हे नंबरनिहाय जाहीर केले जाणार आहे. जेणेकरून
  • बाधित शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार याची माहिती मिळणार

संपादनासाठी करण्यात येणाऱ्या मूल्यांकनाबाबत जिरायती, बागायती जमिनी, शेतातील झाडे, विहीर आणि घरांचा विचार करून अचूक मूल्यांकन करावे, यात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply