पुणे : राज ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी मनसैनिकाचा अक्कलकोट ते मुंबई पायी प्रवास

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दीर्घायुष्य आणि स्वास्थ्य लाभावे यासाठी अक्कलकोट येथील नागेश कुंभार हा मनसे कार्यकर्ता अक्कलकोट ते मुंबई पायी चालत निघाला आहे. नागेश कुंभार याचे पुण्यात आगमन झाल्यानंतर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी त्याचे स्वागत केले. यानंतर नागेश कुंभार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आरती देखील केली. माझ्या हिंदू जन नायकाला दीर्घायुष्या लाभू दे, अशी प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे नागेश कुंभार यांनी केली.

“मी ट्रक चालक असून आजवर अनेक सभा प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या आहेत. ज्यावेळी राज ठाकरे यांच्या आजारपणाबाबत समजले तेव्हा ठरवले की त्यांच्या आरोग्यासाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन मुंबईला जायचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ जूनपासून अक्कलकोट येथून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यास मुंबईच्या दिशेने निघालो आहे. आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घेतले. त्यामुळे मला वाटते की,राज ठाकरे यांच्या हस्तेच हिंदूचे रक्षण होऊ शकते. या कामासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावे,” अशी प्रार्थना केली आहे, असे नागेश कुंभार यांनी सांगितली.

आजपर्यंत कधी ही राज ठाकरे यांना भेटलो नाही. पण २४ तारखेपर्यंत मुंबईत मी दाखल होईल तेव्हा त्यांना निश्चित भेटणार आहे. त्या दिवसाची मी वाट पाहत आहे असेही नागेश कुंभार यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *