पुणे : राज ठाकरेंचे राजकारणात काहीच आस्तिव राहिलेल नाही म्हणून राज ठाकरे पवारसाहेबांवर टीका करतात; सुरेखा पुणेकरांची बोचरी टीका

पुणे : राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले तसंच टीकाही केली होती. याच पार्श्वभूमीवर आथा लावणीसम्राटणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरेंचे राजकारणात काहीच आस्तिव राहिलं नसल्याने ते चिडून पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मात्र सर्व जाती समभाव एक करुन गाव खेडी एकत्र करुन राज्यात पहिलं महिला धोरण पवारसाहेबांनी राबविले आहे. आता पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका करणंही राज ठाकरेंना शोभत नसल्याची बोचरी टीका सुरेखा पुणेकरांनी केली. त्या नारायणगाव येथील लावणी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी बोलत होत्या.

कालच्या औरंगाबाद येथील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे जाती-जातींमध्ये भेद निर्माण करतायत ते पुस्तक वातचना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे बघतात. तसंच आपण बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचे नावं घ्यायला सुरुवात झाली. तसंच मी शरद पवार नास्तिक आहेत हे बोलल्यावर चांगलच झोंबल. मला माहिती होतं ते मी बोललो लगेच देवाचे फोटो काढले. मात्र, त्यांच्या कन्येने लोकसभेत सांगितलं आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी' असंही राज म्हणाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply