पुणे : रविवार पेठेत सोने-चांदी विक्री दुकानाच्या कार्यालयास आग

पुणे : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका कार्यालयाला लागलेल्या आगीत दुकानातील अनेक मौल्यवान वस्तु जळाल्या. हि घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात घडली.

रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात "यूनिटी अपार्टमेंट" नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोने-चांदी विक्री दुकानाचे कार्यालय आहे. या दुकानाला शुक्रवारी सकाळी सात वाजता अचानक आग लागली. याबाबतची खबर मिळताच अग्निशामक दलाची 3 वाहने तेथे दाखल झाली.

जवानांनी काही वेळातच आग विझवली. या आगीच्या घटनेत अनेक मौल्यवान वस्तु जळाल्या, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, या आगीच्या घटनेतून वाचविलेल्या काही वस्तू अग्निशामक दलाच्या जवानांनील विक्रेत्यास परत केल्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *