पुणे येथील अमेनोरा टाऊनशीपमध्ये होळीच्या पार्टी महागात, २१ मोबाइल चोरीला

पुणे : हडपसरमधील अमनोरा येथील मॉलमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी तरुण-तरुणीकडील तब्बल २१ मोबाइल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. हि घटना शुक्रवारी घडली असून याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल चोरीला गेल्याची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. होळीनिमित्त अमानोरा माॅलमध्ये "सनबर्न होली पार्टी"चे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये तरुण-तरुणी मोठ्या संख्येने युवक-सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उच्च क्षमतेची लाउड स्पीकर वापरले होते. दरम्यान, या गोंधळातच नृत्य करणाऱ्यांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, एक- एक करीत अनेकांनी आपले मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी संयोजकांकडे करण्यास सुरु करण्यात आल्या, हा सर्व प्रकार हडपसर पोलिसांपर्यंत पोचला. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडे येत होत्या. दरम्यान, पोलिसांकडुन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तसेच या पार्टीमध्ये कोरोना संबंधित नियमाचे उल्लंघन करुन क्षमतेपेक्षा जादा लोकांना प्रवेश देण्यात आला असल्याने तसेच सुरक्षेकडेही लक्ष देण्यात आले नसल्याने हा प्रकार घडल्याची तक्रार पुढे आली आहे, त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply