शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले होते. तरुणीच्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आला होता. या प्रकरणी रघुनाथ कुचिक यांना जामीन मिळाला. पण रघुनाथ कुचिक यांनी अटी आणि शर्तीचा भंग केला आहे,असा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यामुळे कुचिक यांचा जामीन रद्द केला जावा अशी मागणी पुणे पोलिसांकडे केली होती. त्याबाबत अखेर सोमवारी चित्रा वाघ यांचा शिवाजीनगर पोलिसांनी जबाब घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, माझ्याकडील सर्व पुरावे मी पोलिसांना दिले आहेत. मला विश्वास आहे की,येणार्या दिवसांमध्ये १०० टक्के कुचिक यांचा जामीन रद्द होईल.
“१२ एप्रिल रोजी माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. यानंतर पीडितेने केलेला खुलासा मी पोलिसांकडे दिला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मी मागणी केली होती की, ज्या अटी शर्तींवर रघुनाथ कुचिक यांना जामीन मिळाला आहे तो रद्द व्हावा. त्यांनी अटी शर्तींचा भंग केला आहे. पोलिसांनी त्याची चौकशी करुन जामीन रद्द होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्या अर्जावरील सविस्तर जबाब शिवाजीनगर पोलिसांनी घेतला आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. माझ्याकडे जे पुरावे होते ते मी पोलिसांना दिले आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द होईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक यांच्यावर गुन्हा दाखल असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप त्यांचा राज्यमंत्री पदाचा दर्जा काढलेला नाही. आज ही ते समाजात उजळ माथ्याने फिरत आहे. त्यामुळे असल्या समाज कंटकांची जागा जेल मध्येच आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
या प्रकरणात चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. याबाबतही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्या पीडित तरुणीसोबत सुरवातीपासून होते. मी तिला कायदेशीर मदत केली आहे. तिने कोणाच्या दबावाखाली माझ्यावर आरोप केले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच बरोबर राज्यातील महिला किंवा तरुणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी मी सर्वांच्या सदैव सोबत आहे. मी आज देखील, त्या तरुणीच्या सोबत आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

