पुणे : मोक्का कारवाईनंतर दीड वर्षे फरार असलेला आंदेकर टाेळीतील २६ वर्षीय गुंड अटकेत

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर गेले दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नाना पेठेतील आंदेकर टोळीतील गुंडाला पोलिसांनी पकडले.

कुणाल सोमनाथ रावळ (वय २६, रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध फरासखाना व समर्थ पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. व्यापारी पेठ असलेल्या नाना पेठेत दहशत माजविल्याच्या प्रकरणांत सुर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती.

कारवाई केल्यानंतर रावळ पसार झाला होता. रावळ नाना पेठेत येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश जाधव आणि अक्षयकुमार वाबळे यांना मिळाली. त्यानंतर सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून रावळला पकडले. न्यायालयाने रावळला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply