पुणे : मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी पाणी शिरले ; हडपसर भागात झाड कोसळले

पुणे : मुसळधार पावसाने सोमवारी रात्री झोडपून काढले. शहरात तीन ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या; तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावर आकाशवाणी परिसरात झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

शहरात रात्री साडेनऊच्या सुमारास मुसळधार पावसास सुरूवात झाली. कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *