पुणे : मुळा-मुठा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आष्टापूर ते हिंगणगाव दरम्यान नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव सुखदेव कोतवाल, सचिन गोरव थोरात (रा. आष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी नूरजहाँ सैय्यद यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतवाल, थोरात यांनी हवेली तालुक्यातील अष्टापूर परिसरातील मुळा-मुठा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केला. दोघांनी नदीपात्रातून तीन लाख रुपयांची वाळू चोरली.

तहसील कार्यालयातील भरारी पथकाच्या लक्षात वाळू चोरीचा प्रकार आल्यानंतर या प्रकरणी तक्रार देण्यात आली. पोलीस हवालदार ठाणगे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply