पुणे : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची १६ लाखांची फसवणूक; कोथरुड पोलिसांकडून तिघांवर गुन्हा

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष उबाळे, संदीप उदमुले, यशोब देवकुळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ओम विनायक मेमाणे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) याने या संदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी आरोप उबाळे, उदमुले, देवकुळे यांच्याशी मेमाणे याची ओळख झाली होती. मेमाणेला महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. त्यानंतर मेमाणे, त्याचे मित्र शरद शिंदे, मयूर पवार आरोपींना भेटले. त्यांच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली.

आरोपींनी त्यांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तिघांकडून आरोपींनी १६ लाख १० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी नोकरीबाबत आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी तिघांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील उपायुक्तांच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र दिले. नियुक्त पत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply