पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौर्‍यावर; विविध पक्षातील पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शहरातील कोणते नेते मनसेमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या महिन्यात विदर्भ दौर्‍यावर जाऊन आले आहेत. विदर्भ दौऱ्यानंतर आता ते पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुण्यातील डेक्कन परिसरातील राज महाल येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर आज सकाळी राज ठाकरे स्वतः चारचाकी वाहन चालवत नवी पेठतील कार्यालयात आले. त्यावेळी मनसेचे नेते अभिजीत पानसे, अविनाश अभ्यंकर, किशोर शिंदे हे पदाधिकारीसोबत होते. राज ठाकरे यांचा आजचा दौरा विशेष मानला जात असून काही वेळात खडकवासला मतदार संघातील विविध पक्षातील पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळी राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply