पुणे : मतीमंद तरुणीवर बलात्कार ; एकास अटक

मतिमंद तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकास मुंढवा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी शंकर अंकुश ताकमोगे (वय ५८, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडीत तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी मतिमंद आहे. तिची आई एका सोसायटीत रखवालदार आहे. सोसायटीने त्यांना राहण्यास जागा दिली आहे. आरोपी ताकमोगे याने मतिमंद तरुणीला घरात बोलावले.

गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. मतिमंद गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *