पुणे : भारत बायोटेकने विकसित केलेल्या करोना लशीच्या फवाऱ्याला आपत्कालीन वापराची परवानगी

पुणे : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण भविष्यात अधिक वेगवान करण्यासाठी नवीन लशीच्या फवाऱ्याला (इंट्रानेसल स्प्रे) केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. १८ वर्षांवरील सर्वांसाठी हा फवारा उपयुक्त ठरणार असून कोव्हॅक्सिन लशीची उत्पादक कंपनी असलेल्या हैदराबाद येथील भारत बायोटेकतर्फे ही लस विकसित करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. नाकातील फवारा स्वरूपात करोना लस उपलब्ध झाल्याने येत्या काळात इंजेक्शन, सुया या वस्तूंची गरज कमी होईल तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्वही कमी होण्याची शक्यता आहे. देशातील १४ ठिकाणी केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये फवारा स्वरूपातील लस ही कोव्हॅक्सिनच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लशी घेतलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून ही लस देता येईल का याबाबत एक स्वतंत्र चाचणीही करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. करोना हा आजार प्रामुख्याने फुप्फुसे आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा असल्याने नाकातील लस थेट आणि अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply