पुणे: भांडारकर, प्रभात, विधी महाविद्यालय रस्ता परिसरात पाणी समस्या

शिवाजीनगर : कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार कळवून देखील काही उपाययोजना होत नाहीत. भांडारकर, विधी महाविद्यालय, बी.एम.सी.सी रस्ता या भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. असं सांगत होत्या डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या अध्यक्षा स्मिता काळे. वरिल परिसरात मागील पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाणी समस्या जाणवू लागल्याने रहिवाशांना विकत पाणी टॅंकर मागवावे लागत आहेत. दिवसभरात तीस ते चाळीस टॅंकर विविध सोसायट्या मध्ये पाणीपुरवठा करतात. विशेष म्हणजे प्रभात रस्त्यावर गल्ली नंबर दोन, तीनला खूपच कमी प्रमाणात पाणीपुरवठा होऊ लागला आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीधर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या भागात पाणीपुरवठा करणारे अधिकारी दररोज सकाळी तिथं समस्या सोडविण्यासाठी जात आहेत. पाण्याचा दाब का कमी झाला हे तपासण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइनमध्ये दगड, पाणी बाटली वगैरे अडकली असेल तर ती वरुन दिसत नाही. त्यासाठी पाइपलाइनची व्यवस्थीत तपासावी करावी लागेल. संपूर्ण डेक्कन जिमखाना सोसायटी, स्मृती भांडारकर लेन नंबर तीन, सरस्वती अपार्टमेंट,सावता माळी सोसायटी भंडारकर रोड, शिवनेरी सोसायटी भंडारकर रोड, धनंजय आपारमेंट भंडारकर रोड , संपूर्ण अमराई कॅम्प डेक्कन जिमखाना


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply