पुणे - विभागीय आयुक्त सौरभ राव, तत्कालीन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्यासह भारतीय प्रशासक सेवेतील अधिकाऱ्यांच्या (Officer) नावाने बनावट एनए ऑर्डर, तसेच पुणे महापालिकेच्या नावाने बनावट भोगवटा प्रमाणपत्र (Bogus Certificate) सादर करून दस्तनोंदणी (Stamp Registration) करण्यात आलेल्या ११२ प्रकरणांमध्ये जवळपास ११० प्रकरणांमध्ये बोगस प्रमाणपत्र असल्याचे तपासणीअंती समोर आले आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून या सर्वांच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पुण्यात मोठ्या पदावर काम केले आहे. परंतु त्यांनी कधीच प्रांताधिकारी म्हणून पुण्यात काम केले नाही. तसेच थेट भारतीय प्रशासकीय परीक्षा पास झालेल्या (आयएएस) अधिकाऱ्यांचे नाव प्रांताधिकारी म्हणून बोगस आदेशात वापरण्यात असल्याचे समेार आले होते. याबाबतची बातमी सर्व प्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात खळबळ उडाली होती. त्याची दखल घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ३ (हडपसर) येथील मागील पाच महिन्यात नोंदविलेल्या १ हजार ४७२ दस्तांची तपासणी केली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केली. त्यामध्ये सुमारे १० टक्के म्हणजे ११२ इतके दस्त बोगस एनए ऑर्डर, बोगस भोगवटाप्रमाणपत्राच्या आधारे नोंदविण्यात आल्याचे आढळले.
या प्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यापूर्वीच तीन प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांकडून तीन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने या ११२ दस्तांमधील एनए ऑर्डरचे क्रमांक, त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्याची सत्यता पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आयएएस सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार करण्यात आल्याने महसूल विभागाने तत्परतेने या ११२ एनए ऑर्डरची छाननी केली. यामध्ये फक्त दोन एनए ऑर्डर या खऱ्या आढळून आल्या तर ११० एनए ऑर्डर या बनावट असल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल महसूल विभागाकडून नोंदणी विभागाकडे सादर करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन बांधकाम केले असेल तसेच रेरा क्रमांक असेल तरच दस्तनोंदणी करता येते. मागील दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणीस बंदी आहे. यामुळे अनेक अनधिकृत इमारतींमधील दस्तनोंदणी होत नाही. उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाले आहेत. अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार सदनिका पडून आहे. हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदनिकांची दस्तानोंदणी करून घेण्यात आली. बोगस एनए ऑर्डर बनवून त्या आधारे दस्तनोंदणी करण्यात येत होती.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

