पुणे :बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दोन दलाल अटकेत

रुबी हॉल क्लिनिकमधील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दोन दलालांना कोरेगाव पार्क पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने दोघांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. रजपूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. याबाबत आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालक डॉ. संजोग कदम (रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. गटणे आणि रोडगे यांना शुक्रवारी पहाटे भोसरी परिसरातून अटक करण्यात आली, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिली.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *