पुणे : बुधवार पेठेत जुगार अड्ड्यावर छापा : ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त ; १८ जणांच्या विरोधात गुन्हा

पुणे : बुधवार पेठेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाइल संच, रोकड असा ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जुगार अड्डयाचा मालकासह १८ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकऱ्णी जुगार अड्डयाचा मालक अनिल निवृत्ती बांदर्गे (वय ५२, रा. रविवार पेठ), वसीम जाफर शेख (वय ३२, रा. पाॅप्युलर होम, गणेश पेठ) यांच्यासह जुगार अड्ड्यावरील कामगार तसेच जुगार खेळणारे अशा १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील साई एंटरप्रायजेस दुकानात पणती पाकोळी, सोरट असे जुगाराचे प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली.

तेथून जुगार खेळण्याचे साहित्य, रोकड तसेच सात मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, मोहिते, शिंदे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply