माळशिरस : नायगाव (ता. पुरंदर) येथील प्रगतिशील शेतकरी संदीप खेसे व गणेश खेसे या खेसे बंधूंनी आपल्या अडीच एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामधून सत्तर टक्के क्षेत्रात सहा क्विंटल कांदा बियाणे तयार झाले आहे. त्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा होत आहे.
खेसे बंधूंनी लागवडीची पूर्वतयारी करताना प्रथमत: शेत नांगरून दोन पाळ्या घालून जमीन भुसभुशीत केली व त्यातील अगोदरच्या पिकातील धसकटे वेचून शेत स्वच्छ व सपाट केले व चार फुटांवर ड्रिपचे लॅटरल अंथरूण घेतले व नंतर अडीच एकर क्षेत्रामध्ये लागवड केली.
खत व्यवस्थापन करताना लागवडीअगोदर एकरी १०० किलो १०:२६:२६, बेनसल्फ १० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो, २० किलो रुट्स दाणेदार टाकले. गोट कांदे वीस दिवसांचे झाल्यानंतर पहिला खताचा डोस १०० किलो २४: २४:० व दहा किलो मायकोरायझा टाकले. दुसरा डोस लागवडीपासून ५० दिवसांनी १०० किलो १८:४६ व ५० किलो पोटॅश (mop)टाकले. अधून मधून पाणी देताना १९:१९:१९, १२:६१, १३:४०:१३ व शेवटी ०:५२:३४ सोडले तसेच मुळकुज साठी ट्रायकोडर्मा, हुमिक व पी एस बी केएसबी पाण्यातून जमिनीत सोडले.
अशी केली लागवड १. लॅटरल अंथरण्याच्या अगोदर एक फुटाचे अंतरावर ठेवले २. छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने दोन काकऱ्या मारल्या व दीड फूट अंतर ठेवले ३. यामध्ये कांद्याचा एक तृतीयांश भाग चिरून कांद्याची लागवड केली. ४. त्यामुळे ढेगळ्यांची संख्या जास्त आली.
कांदा बियाण्याची निवड लागवडीसाठी पूना फुरसुंगी कांद्याची टिकवणक्षमता व कलर चांगला असतो व तो साठवणीसाठी व विक्रीसाठी चांगला चालतो. यामुळे पूना फुरसुंगी या जातीच्या कांद्याची खरेदी केली व त्यासाठी कीर्ती बिजांकूर सीड्सचे अमोल शितोळे साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. कांदा हा एकसारख्या आकाराचा मध्यम गोल व फाकटी विरहित घेतला.
बोंडामध्ये चांगली बियाणे भरण्यासाठी मधमाशांची खूप आवश्यकता असते. मधमाशांची संख्या कमी दिसल्यामुळे कृषी विभागातून श्री. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशांच्या तीन पेट्या आणल्या तसेच शेतामध्ये पिवळी रंगाची झेंडू, सूर्यफूल, मोहरी इ . फुलांची लागवड केली. त्यामुळे मधमाश्या आकर्षित होऊन बोंडामध्ये चांगले बियाणे भरले.
गेल्या हंगामामध्ये प्रयोग म्हणून थोड्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे दिले. ज्या शेतकऱ्यांनी त्याचा कांदा शेतात लावला त्या कांद्याचा कलर, एकसारखेपणा, उगवणशक्ती व आकारमान चांगला आला. त्यामुळे कमी दरामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे या उद्देशाने फक्त १५००/- रुपये किलो या माफक दराने विक्री करणार आहे. राहिलेले बियाणे याच दराने कीर्ती बीजांकूर सीड्स पुणे या कंपनीने घेण्याची हमी दिली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


