पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे पावणे दोन कोटींची खंडणी

पुणे : जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी राजन नायर, त्याची पत्नी सगाई राजन नायर (रा. धायरकर काॅलनी, मुंढवा) तसेच संविधानिक टेन प्रोटेक्शन फोर्स या संघटनेतील दोन जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय भांडारकर रस्ता परिसरात आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून मुंढवा भागात एका गृहप्रकल्पाचे काम करण्यात येत होते. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केले होते.

बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. बांधकाम व्यावसायिकाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. नायर आणि साथीदारांनी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात फलक लावले होते. बांधकाम व्यावसायिकाने तक्रार अर्ज दिल्यानंतर या प्रकरणात तपास करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply