पुणे : पुण्यात CBI ची छापेमारी ; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले CBI च्या तडाख्यात

मुंबई आणि पुण्यात सध्या सीबीआयची छापेमारी सुरू असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचं घर आणि काही मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसंच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *