पुणे: फडणवीसांनी शेकडो कोटी दिले, मग इंदू मिलचं काम का थांबवले?- गोपीचंद पडळकर

पुणे: बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा गेले पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे. मी पुरोगामी आहे, मी या जातीचं कल्याण करतो त्या जातीच कल्याण करतो हा बुरखा घातलेला लांडगा बहुजनांच्या मुलांना आता माहिती झालं आहे अशा टोला नाव न घेता शरद पवार यांना आमदार गोपिचंद पाडळकर यांनी टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर  हे मावळातील कामशेतमध्ये बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आणि भाजप (BJP) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे, उपस्थित होते.

देवेंद फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शेकडो कोटी दिले जागा ताब्यात घेतली. मग काम का बंद ठेवले असा सवाल पाडळकर यांनी आघाडी सरकारला विचारला आहे. कोणी चळवळी फोडल्या, बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष कोणी फोडला, धनगर समाजाची लढाई 1990 साली चांद्या पासून ते बांद्या पर्यंत बी के गोकरे यांची चळवळ कोणी फोडली हे सर्व बहुजन च्या लोकांना आता माहिती झालं आहे असेही पडळकर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply