पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर त्याचा सगळ्यात पहिला दणका इमारतीच्या सामाईक अंतरात अतिक्रमण करणाऱ्या जागा मालकांना बसणार आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार इमारतीच्या पुढील जागेत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. इतरवेळी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबवली जायची; पण आता प्रशासक असल्याने परिणामकारक कारवाईचे नियोजन केले आहे. महापालिकेतर्फे बांधकाम परवानगी देताना सामाईक अंतर सोडले आहे का, हे पाहिले जाते. यामध्ये इमारती समोरील आणि बाजूने जागा सोडणे बंधनकारक आहे. इमारतीच्या चारीही बाजूने मोकळी हवा खेळती राहावी व अपत्कालीन स्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अंतर महत्त्वाचे असते.
शहरातील इमारतींचे दर वाढत असल्याने, दुकानांचे भाडेही जास्त आहे. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक जागा मालक इमारतीसमोरील जागेमध्ये अतिक्रमण करतात. यात पक्के बांधकाम करून किंवा शेड मारून ही जागा बंदिस्त केली जाते. त्यामुळे विद्रूपीकरणात भर पडते, पार्किंगच्या जागेत व्यवसाय सुरू केल्याने संबंधित इमारतींमधील गाड्या रस्त्यावर लावल्या जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.
शहरात इमारती समोरील आणि बाजूच्या जागेचा वापर करून अनेक ठिकाणी हॉटेल, गॅरेज, फळ विक्री, भाजीविक्रेते अशा प्रकारचे लहानमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या जागेचा वापर करून तेथे गोडाऊन किंवा दुकाने थाटली आहेत. महापालिकेने दिलेल्या परवानगीशिवाय परस्पर कोणताही बदल करून पक्के बांधकाम किंवा कच्चे बांधकाम करता येत नाही. महापालिकेने यावर कारवाई सुरू केली की नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते दबाव आणून कारवाई रोखत असत, त्यामुळे परिणामकारक कारवाई होत नव्हती. आता महापालिकेने याकडे मोर्चा वळवला आहे.
महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेच्या कामातील राजकीय हस्तक्षेप कायदेशीरपणे बंद झाला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शहरातील फ्रंट व साइड मार्जिनमधील कारवाईचे आदेश दिले आहेत.
महापालिकेची जय्यत तयारी
महापालिकेचे ५ परिमंडळ कार्यालय असून, त्यात १५ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. परिमंडळाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधून कारवाईचे नियोजन करावे. या पथकात अतिक्रमण निरीक्षक, बिगारी, पोलिस कर्मचारी यांचा समावेश असेल. तसेच जेसीबी, गॅस कटर यांचाही वापर कारवाईत केला जाईल.
फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमध्ये कारवाई करण्यासाठी प्रत्येक परिमंडळात पथक तयार केले आहे. आठवड्याचे दोन दिवस परिमंडळ कार्यालयनिहाय या अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त याचे नियोजन केलेले आहे. महापालिकेने कारवाई करण्यापूर्वीच नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे.
- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग
कुठे पडणार हातोडा
- इमारतीसमोर आणि बाजूला बांधलेले शेड
- उभारण्यात आलेले छोटेखानी व्यवसाय
- परवानगीशिवाय परस्पर केलेले बांधकाम
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
