पुणे : घरफोडीच्या घटना घडत असतानाच तेथे दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक, चाकू फेकून मारण्याच्या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेचा मार्केट यार्ड पोलिसांनी कसून तपास करीत पुण्यासह राज्यभरात घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोरट्यांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरफोडीसाठी वापरलेले साहित्य आरोपींकडून जप्त केले.
नवलसिंग अजम अलावा (वय 40, रा. धार, मध्यप्रदेश) , भाया भांगु देवका (वय 32) विनोद रमेश सिसोदिया (वय 29 दोघेही रा. कुकशी, धार, मध्यप्रदेश ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मार्केट यार्ड परिसरातील चाफळकर कॉलनी येथे 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका सोसायटीत चोरट्यांकडून घरफोडी करण्यात आली होती. त्याची खबर मार्केट यार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक, कोयता फेकून हल्ला चढविला होता.
पोलिसांनीही चोरट्यांचा जोरदार प्रतिकार करीत त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले होते. या प्रकरणाचा मार्केट यार्ड पोलिसांकडून कसून तपास सुरु होता. तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाकडून सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला जात होता. तेव्हा संबंधि आरोपी हे जनता वसाहतीमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन दिसून आले.त्यानुसार, पोलिसांकडून संबंधित आरोपींवर रात्रपाळत ठेवण्यात आली होती.
दरम्यान, संबंधित प्रकरणातील तीन आरोपी पर्वती येथील कालव्याच्या परिसरात दिसून आले. तेव्हा त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, घरफोडीसाठी वापरलेले कटर, टॉमी व अन्य साहित्य जप्त केले. हि कामगिरी परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, हिरवाळे, किरण जाधव, महेश जाधव, आशिष यादव, स्वप्नील कदम, संदीप सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

