पुणे : पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या पत्नीवर भरस्त्यात चाकूने वार; पर्वती परिसरात घटना; पती अटकेत

पुणे : कौटुंबिक वादातून पतीच्या विरोधात तक्रार देणाऱ्या पत्नीवर भररस्त्यात शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पर्वती भागात घडली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.  अक्षय मोहन सोनार (वय २७, रा. गोलघर, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत कार्तिका अक्षय सोनार (वय २२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  अक्षय आणि कार्तिका यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. दोघेही पर्वती भागातील गोलघर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. दाेघांमध्ये किरकाेळ कारणावरुन वाद झाले होते. कार्तिका आई-वडिलांना घेऊन पतीच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास निघाल्या होत्या. पाठीमागून आलेल्या अक्षयने कार्तिकावर हल्ला चढविला. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. पसार झालेल्या अक्षयला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक निकाळजे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply