पुणे पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

“पुणे पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहन चालकांसाठी मिळावी यासाठी diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. मोबाईलवर एका क्लिकवर पालखीचे सगळे अपडेट मिळणार आहे.” अशी माहिती पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले, “पुण्यात एक पालखी दोन दिवस, तर दुसरी तीन दिवस असणार आहे. शहरात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामाची तयारी पोलिसांनी केली आहे. खुले असलेले रस्ते, बंद रस्ते, पालखीचा मुक्काम या सगळ्यांसह वाहतुकी बद्दल सगळे अपडेट मिळणार आहेत.”

तसेच, “नागरिकांसाठी पार्किंगची सोय कुठे केली आहे. हे देखील संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पाहिल्यादाच ड्रोनद्वारे पोलीस पाहणी करणार आहेत. शहरात एकूण चार हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे.यामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त, ९ पोलीस उपायुक्त, १९ पोलीस आयुक्त, १०३ पोलीस निरीक्षक, ३०७ सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, सहायक, पोलीस अंमलदार, वाहतुक पोलीस असा फौजफाटा असणार रस्त्यावर आहे.” अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

याचबरोबर, संभाजी भिडे हे त्यांच्या धारकऱ्यांसह पालखी सोहोळ्यात सहभागी होतात. यामुळे वादाचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहेत. त्याबद्दल बद्दल आयुक्तांना विचारले गेले असता, पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात कोणालाही घुसता येणार नाही.”, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply