पुणे : पुण्यात सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून ७३ हजारांचे दागिने लुटले

पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्याचबरोबर हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे पुण्यात सक्रिय झाले आहेत. पुण्यातील लोहगावात सराफा व्यावसायिकाचा गळ्याला कोयता लावून लुटल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून ७३ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. व्यावसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आझाद चौकात महाले ज्वेलर्स या सराफ दुकानामध्ये दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला.

एकाने सराफ व्यवसायिकाला कोयत्याचा धाक दाखवला, तर दुसऱ्या चोरट्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी ७३ हजाराच्या दोन सोनसाखळ्या लांबवल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस करित आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *