पुणे : नेहरू स्टेडियममध्येही ढोल ताशाचा दणदणाट; पोलीस आणि पालिकेच्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह

पुणे : नदीपात्रातील रस्त्याबरोबरच मोकळ्या जागांवर ढोल पथकांचा सराव सुरू झाला असतानाच ढोल-ताशा पथकांकडून स्वारगेट परिसरातील नेहरू स्टेडियम मैदानातही दणदणाट सुरू झाला आहे. मात्र या सरावाला परवानगी नसल्याचे पुढे आले आहे. ढोल-ताशा पथकाचा सराव बेकायदा असून त्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सरावाच्या परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दरम्यान, आयुक्त विक्रम कुमार यांनी पथकाला सराव करण्यासाठी जागा देण्याचा तोंडी आदेश दिल्याचा दावा महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आला आहे.

नेहरू स्टेडियममधील कबड्डी मैदानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जिल्हा क्रिकेट, कबड्डी खेळाची कार्यालये आहेत. तसेच अण्णा भाऊ साठे वाचनालयही आहे. या संघटनांची कार्यालये सकाळ आणि संध्याकाळ सुरू असतात. या जागेवर पूर्वी रोप वे चे खांब उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याविरोधात उच्च न्यायालयाने केवळ खेळासाठी आणि आतील जागा क्रिकेटसाठी वापरण्यात यावी, असा आदेश दिला आहे. मात्र सध्या महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ढोल-ताशा पथकाचे वादन या जागेत सुरू आहे. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेश चिटणीस संजय बालगुडे आणि कबड्डी संघटनेचे भाऊसाहेब करपे यांनी त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. पथकांना सरावासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली तर आयुक्तांनी जागा देण्यास तोंडी परवानगी दिल्याचा दावा सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आला.

गेले दोन वर्ष करोना निर्बंधामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. निर्बंधाच्या सावटात उत्सव साजरा करण्यात आला होता. ‘श्रींं’ची प्रतिष्ठापना तसेच विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून ढोल-पथके उत्सवातील आकर्षण ठरली आहेत. ढोल-ताशांचे वादन तरुणाईचे आकर्षण आहे. अनेक महाविद्यालयीन युवक-युवती ढोल पथकात सहभागी होतात. सुरुवातीला शहरातील पथके मर्यादित स्वरुपात होती. गेल्या काही वर्षांपासून पथकांची संख्या वाढीस लागली आहे. पथकांनी सराव करण्यापूर्वी पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply