पुणे-नाशिक महामार्गावर ‘आयशर जळुन खाक’

आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाट्याजवळ आयशर टेंम्पोला अचानक पणे आग लागून संपुर्ण टेंम्पो जळाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून आयशर टेम्पो क्रमांक एम.एच ०४ ई.एल ७७३४ पुष्टा घेऊन नाशिककडे जात होते. आळेफाट्याच्यापुढे आळेखिंड परिसरात या वाहनाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन एका बाजुला थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु आग मोठ्या प्रमाणावर लागलेली होती. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी योग्यत्या सूचना दिल्या. आग इतकी भयंकर होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.या लागलेल्या आगीमुळे महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाल्याने पोलिसांनी या दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक वाहतूक एकेरी वळवली होती.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी पुणे - नाशिक राष्टिय महामार्गावरील नारायणगाव या ठिकाणी मालवाहू टेम्पो आगीत जळून खाक झाला होता. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पुष्टा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला आग लागली आहे.त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या वाहणांमध्ये इलेक्ट्रिक च्या केबलची वेळच्यावेळी पहाणी करावी व त्यामुळे शाॅर्टसर्कीट होणार नाही व आग लागणार नाही असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांणी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply