पुणे: नातेवाईकांना भेटून परतताना बँक कर्मचारी महिलेचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी अंत

पुण्यातील हडपसर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एक बँक कर्मचारी महिला आपल्या नातेवाईकांना भेटायला गेली असता, त्यांचा एका रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. नातेवाईकांना भेटून घरी परत येत असताना हा अपघात घडला आहे. अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूची बातमी समोर येताच मृताच्या नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

प्राजक्ता रमेश पाटील असं अपघातात मृत पावलेल्या २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या हडपसर परिसरातील रुणवाल सीगल सोसायटीमध्ये राहत होत्या. प्राजक्ता एका राष्ट्रीयीकृत बँकेत कामाला होत्या. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री त्या मगरपट्टा रस्ता परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तेथून त्या परत घरी येत होत्या. दरम्यान मगरपट्टा उड्डाणपुलाजवळ भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातानंतर टँकरचालकाने गंभीर जखमी झालेल्या प्राजक्ता यांना घटनास्थळी सोडून पळ काढला. आसपासच्या लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्राजक्ता एकुलती एक मुलगी होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मनमिळावू स्वभावाच्या प्राजक्ता यांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने निकटवर्तीयांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांनी फरार टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply