पुणे : नव्या जलवाहिनीतून होणार पाणीपुरवठा; ४०० किलोमीटर काम पूर्ण

पुणे : समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील ४०० किलोमीटर नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे याठिकाणची पाणीगळती कमी झाली आहे, तर ६४ हजार मीटर बसविण्यात आल्याने पाणीवापराचा हिशेब ठेवणे शक्य होणार आहे. पुणे महापालिकेने शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारण्यासाठी २०१८ मध्ये समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली. यामध्ये शहरात १४१ झोनमध्ये २१०० किलोमीटरच्या नव्या जलवाहिन्या टाकणे, ८२ पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार असून, त्यापैकी सुमारे ६५० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे आणि ३८ टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही योजना सुरू होऊन चार वर्ष होत आले तरी अद्यापही केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे मजूर निघून गेल्याने या योजनेचे काम जवळपास सहा महिने ठप्प झाले होते. त्याचाही परिणाम कामावर झाला आहे. राज्‍य सरकारच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामध्ये हे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. शहरातील पाणी वापराचे वाढत जाणारे प्रमाण आणि जलसंपदा विभागाकडून पाणी वापर कमी करावा यासाठी सतत दबाव येत आहे. त्यामुळे पाणी वापर कळीचा मुद्दा ठरत आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे गेल्या तीन वर्षात ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शहराच्या विविध भागात एक लाख ३० हजार पैकी ६४ हजार मिटर बसविले आहेत. योजना सुरू झाल्यापासून गल्लीबोळात ६५० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकून झाल्या आहेत. २०२२-२३ मध्ये १२०० मीमी, १४०० मीमी अशा मोठ्या व्यासाच्या सुमारे ९० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, येत्या वर्षभरात ६० किलोमीटरच्या मुख्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांचा भाग आहे. ३८ टाक्या बांधून पूर्ण समान पाणीपुरवठा योजनेतून शहरात ८६ पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी ३८ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे. काही ठिकाणी टाक्यांना पाइप जोडण्याचे काम सुरू आहे. चतुःशृंगी, पाषाण, शिवनेरीनगर, रोहनकृतिका सिंहगड रस्ता, महादेवनगर येथील टाक्यांचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तसेच १४१ झोनपैकी ५० झोनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. समान पाणीपुरवठा दृष्टिक्षेपात २१०० कोटी योजनेचा खर्च ६०० कोटी आतापर्यंत झालेला खर्च ६५० किलोमीटर नव्याने टाकलेली जलवाहिनी ६४ हजार बसविलेले मीटर कोरोनामुळे कामावर परिणाम झाला होता. आता समान पाणीपुरवठा योजनेला गती देण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी वर्षात काम करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. - अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply