पुणे : नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला.

गुप्ता यांची गृहविभागाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार शनिवारी (१७ डिसेंबर) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपासाबाबतची माहिती ते घेणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *