पुणे: धक्कादायक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, रुबी हॉलच्या १५ जणांवर गुन्हा

पुणे: पुण्यामधून किडनीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी रॅकेट प्रकरणात अखेर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी छडा लावला आहे. संबंधित व्यक्ती डॉक्टर आहेत. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्याबरोबरच अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून, किडनी बदलली गेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.

अखेर आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून रूबी हॉल क्लिनिक विरोधात भादवी ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० ब ३४ व मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ कलम १० ( 19 )  अ, ब, क,  व २० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर परवेझ ग्रँट सह इतर १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये किडनी घेणारा अमित अण्णासाहेब साळुंखे, त्याची पत्नी सुजाता अमित साळुंखे, किडनी देणारी सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, किडनी तस्करी करणारा दलाल रविभाऊ गायकवाड, अभिजीत मदने, ग्रँट मेडिकल फाउंडेशन रूबी हॉल क्लिनिक च्या रेबेका जॉन, रूबी हॉल क्लिनिक नेफरोलॉजिस्ट डॉ अभय संद्रे, यूरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, यूरोलॉजी डॉ हिमेश  गांधी आणि ट्रान्सपोर्ट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या महिलेचं कागदपत्रांची योग्य प्रकारे तपासणी न करता डीजे मेडिकल कॉलेजच्या रीजनल अथोरिझेशन कमिटीची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply