पुणे : दुसरा जन्मच मिळाला! जवानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘ती’ मृत्यूच्या दारातून परतली

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका महिलेला दुसरा जन्म मिळाल आहे. मुलगी आणि पतीसमवेत महिला प्रगती एक्स्प्रेसने मुंबईला निघाली होती. फलाटावर पोहोचताच गाडी सुरू झाली होती. त्यामुळे घाईगडबडीत ही महिला गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यातवेळ तिचा पाय घसरला आणि ती थेट फलाट आणि गाडीच्या डब्यामध्ये अडकली.

हृदयाचा ठोका चुकविणारे हे दृश्य अनेकांनी पाहिले. त्यातून रेल्वे सुरक्षा दलाचा एक जवान पुढे आला. त्याने तत्परता दाखवित तिला लोहमार्गावर पडण्यापूर्वीच वर ओढले आणि मृत्यूच्या दारातून परत आणलं.

राजलक्ष्मी नायरअसे या महिलेचे नाव आहे. या घटनेतच या महिलेच्या जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रगती एक्सप्रेसने नायर या मुलगी आणि पतीसोबत मुंबईला निघाल्या होत्या. त्यांना फलाटावर पोहोचण्यास उशीर झाला त्यावेळी गाडी सुरू झाली होती आणि हळूहळू वेग धरत होती. नायर, त्यांची मुलगी आणि पती हे धावत आले. ते चालत्या रेल्वेमध्ये बसू लागले.

नायर यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीला गाडीत बसविले. त्यानंतर त्या बसू लागल्या, मात्र त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट रेल्वे आणि फलाटाच्या दरम्यान अडकल्या. ही घटना फलाटावरील अनेकांसह त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले रेल्वे सरक्षा दलाचे जवान विनोदकुमार मीना यांनीही पाहिली. त्यांनी तत्काळ धाव घेत नायर यांना ओढून बाहेर काढले. त्यात त्यांना काही प्रवाशांनीही मदत केली त्यामुळे या महिलेचा जीव वाचला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply