पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; लोणीकाळभोरमधील घटना

पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना लाेणीकाळभोर परिसरात घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.अख्तर सय्यद (वय ३९,रा. बाजारतळाजवळ, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. नागझरी, ता. किनवट, जि. नांदेड) याला अटक करण्यात आली आहे.

सय्यदची पत्नी जास्मिन (वय ३५) हिने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद आणि कोवे हे मित्र आहेत. दोघे मजुरी करतात. दोघे जण सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरातील एस. के. वाइन्स दुकानाशेजारी रात्री दारू प्यायला बसले होते. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. सय्यद याच्या डोक्यात कोवेने दगड मारुन मारहाण केली.गंभीर जखमी झालेल्या सय्यदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *