पुणे : दहिहंडी निमित्त शुक्रवारी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल

पुणे : कोरोनानंतर पहिल्यांदाच दहिहंडी उत्सव मोठ्या दणक्‍यात साजरा होण्याची चिन्हे असल्याने त्याचा ताण शहरातील वाहतुकीवर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.19) सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतुक पोलिसांनी केले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहिहंडी उत्सव मंडळांकडून दहिहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहिहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.

असे असतील पर्यायी मार्ग

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे

  • पुरम चौकातुन बाजीराव रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातुन टिळक रस्ता, टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्याल रस्त्याने पुढे जावे

  • स.गो.बर्वे चौकातुन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातुन डावीकडे वळून महापालिकेकडे जावे

  • मजुर अड्डा चौकातुन अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सुरु ठेवण्यात येईल. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातुन मजुर अड्डा चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रस्त्याने पुढे जाईल.

  • रामेश्‍वर चौक ते शनिपार चौकाकडे जाणारी आणि सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply