पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात डेक्कनच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांची उलटतपासणी

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात बचाव पक्षाकडून बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी घेण्यात आली.

डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मनोहर जोशी यांची डाॅ. दाभोलकर हत्याप्रकरणात उलटतपासणी घेण्यात आली. बचाव पक्षाचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत तपासाबाबत प्रश्न विचारले. जोशी यांची उलटतपासणी पूर्ण झाली असून, पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार आहे.

डाॅ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर, डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply