पुणे : ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणासह दोघांचा मृत्यू ; कर्वे रस्त्यावर रसशाळा चौकात अपघात

 

पुणे : कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणांसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मनोज रमेश पाटील (वय २३ रा. बाणेर) आणि नितीन बालाजी मगर (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दुचाकीस्वार पाटील आणि त्याचा मित्र कर्वे रस्त्याने सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निघाले होते.

वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक दिली. अपघातात पाटील याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मगरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोेरे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply