पुणे : टिंडर (Tinder) वर झाली ओळख, भेटीला बोलावून मुंबईत केला बलात्कार

पुणे : टिंडरवरील ओळखीतून पुण्यातील तरुणीला मुंबईत फिरायला नेऊन बलात्कार करणाऱ्यावर डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि.27) राजेश सायनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपी सायनी यांची टिंडर अ‍ॅपवर ओळख झाली. आरोपीने फिर्यादीला घटस्फोटीत असल्याचे खोटे सांगून आयुष्यभर तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला मुंबई येथे फिरायला घेऊन गेला. मुंबईत ताज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार करीत आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *