पुणे : जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी; सरकार जनता विरोधी असल्याची मोहन जोशी यांची टीका

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या आनंदात देशातील जनता असताना मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर नवा पाच टक्के जीएसटी लावून सरकार जनता विरोधी आहे, हे पुन्हा सिद्ध केले आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. भाजपच्या मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश आले असून नोटाबंदी, जीएसटीची घाईने चुकीची अंमलबजवणी याबरोबरच मोठ्या मूठभर उद्योगपतींना धार्जिणे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रचंड महागाईला तोंड द्यावे लागत आहे. जनतेच्या श्वासावर जीएसटी लावणे एवढेच आता बाकी राहिले आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *