पुणे: जीएसटी लाचखोरी प्रकरणात सीबीआयचे तीन ठिकाणी आरोपींच्या कार्यालयावर छापे

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लाचखोरी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) पुणे आणि मुंबईसह तीन ठिकाणी आरोपींच्या कार्यालयात छापा टाकला. त्यामध्ये कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला.
जीएसटी गुप्तचर विभाग महासंचालक कार्यालयातील उपसंचालक विमलेश कुमार सिंग आणि वरिष्ठ गुप्तचर अधिकारी राहुल कुमार या दोघांनी एकाला कारवाई टाळण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी महासंचालक कार्यालयाकडून तक्रार देण्यात आली होती.

त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका तक्रारदाराच्या जागेवर दाखल केलेला खटला बंद करण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. १० मार्च २०२२ रोजी करचुकवेगिरीच्या आरोपावरून आरोपींनी तक्रारदाराच्या जागेवर छापा टाकला होता. तक्रारदाराला वारंवार चौकशीसाठी बोलावले जात होते. याप्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईसह तीन ठिकाणी आरोपींच्या कार्यालयात छापा टाकून कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply